
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान सोहळा २०२६’ मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भंडारा जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कायार्ची दखल घेत, जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाºयांना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री ना. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड, डॉ. बाविस्कर उपसंचालक आय इ सी ब्युरो पुणे व वरिष्ठ संचालक, अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील पुरस्कार सोहळ्यामध्ये भंडारा जिल्ह्याला सार्वजनिक आरोग्य विभागांमार्फत राबविण्यात आलेल्या “स्वस्थ नारी सशक्त अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी साठी जिल्हा स्तरीय महिला नोडल अधिकारी पुरस्कार डॉ. मनीषा साकोडे, जिल्हा माता बाला संगोपन अधिकारी , जिल्हा परिषद भंडारा याना देण्यात आला डॉ. मिलिंद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ संदीपकुमार गजभिये जिल्हा शल्यचिकित्सक व डॉ. कांचन कोटगले, वैद्यकीय अधिकारी ह्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तालूक्यातील व परिसरातील गरजू रुग्णांना तातडीच्या, गंभीर रुग्णसेवा तसेच सिझेरियन व सामान्य प्रसूती सेवा, इतर शस्त्रक्रिया, आंतररुग्ण सेवा, सोनोग्राफी, एक्सरे, रक्ततपासणी इत्यादी सेवा मोफत वेळेवर दिल्या बद्दल डॉ. धीरज लांबट वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पवनी याना स्नमानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ग्रामीण जनतेला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अंतर्गत दर्जेदार उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण दिल्याबद्दल डॉ. कांचन कोटगले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा, तालुका पवनी यांना सन्मानित करण्यात आले.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) अंतर्गत उत्कृष्ट काम करणाºया व डढऊ च्या टोकन जनरेशनसाठी डॉ. सविता मालडोंगरे वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव यांना सन्मानित करण्यात आले. सन २०२४-२५ च्या कामकाजाच्या आधारे उल्लेखनीय कामगिरी करता व जिल्ह्यातून सर्वात जास्त मानधन मिळविणाºया आशा स्वयंसेविका रेखा रमेश कुंभलकर, गाव रोहा, उपकेंद्र- बेटाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र- बेटाळा, तालुका-मोहाडी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले. महाआरोग्य सन्मान सोहळा प्रसंगी आरोग्य मंत्री म्हणाले, राज्यातील जनतेला उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘आरोग्याच्या ध्यास महाराष्ट्राचा विकास’ या संकल्पने अंतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. आज महाराष्ट्र पॅलेअॅटिव्ह केअर या उपक्रमाचा शुभारंभ होत असुन वृद्ध, गंभीर आजार व असहाय्य रुग्णांना घरी जाऊन सन्मानपूर्वक आरोग्य सेवा देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य असून ते पुण्याईच काम आहे. राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांनी ही योजना प्रभावीपणे राबवावी महाराष्ट्राचे काम देशाला दिशादर्शक ठरेल तसेच प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम करणाºया माणसाचा गौरव केला गेला पाहिजे चांगलं कामकरणाºया माणसांची यंत्रणेत संख्या वाढली पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असे आपण काम करूया महाराष्ट्र आरोग्य संपन्न बनवूया असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राज्यात ५८० ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या मेनोपॉज क्लिनिक उपक्रमाचे राज्यस्तरीय लोकार्पण, तसेच इतर लोकोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या रुग्णांना योग्य उपचार सेवा दिली तर त्यांचे आशीर्वाद मिळतात. आशाताई हा तर सार्वजनिक आरोग्याचा कणा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाशी आशाताई यांचा संबंध येतो. त्यामुळे त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महिला आरोग्याच्या दृष्टीने मेनोपॉज क्लिनिक हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही याविषयी काही गैरसमज आहेत, ते दूर करण्याची गरज आहे. अजूनही महिला या विषयी बोलताना संकोच बाळगतात. मेनोपोज क्लिनिक त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. पुरस्कार वितरणासोबतच आरोग्य विभागाच्या वतीने हॉस्पिटल मॅन्युअल, पी.एच.सी मॅन्युअल आणि जन्म- मृत्यू साहित्याचे प्रकाशन तसेच मातृत्व आरोग्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या आरोग्यविषयक जनजागृती व्हिडिओचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.