दूषित पाणी पुरवठ्याची शासन दरबारी दखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दूषित पाणी पुरवठ्यामुळे वरठी येथील दवाखाने गर्दीने फुल्ल झाली. गावात नानाविध आजाराने पाय पसरल्यावरही ग्राम विकास अधिकाºयाची मलाई खाण्याच्या वृत्तीत फरक न पडल्याने संतप्त नागरिकांनी शासकीयदरबारी तक्रार केली. दूषित पाणी पुरवठ्याची शासन दरबारी दखल घेण्यात आली आहे. जलशुद्धीकरण साहित्य तपासणीसाठी पाठवण्यात आली असून ग्राम पंचायत ने तांत्रिक कारण पुढे करून पाणी पुरवठा बंद असल्याची दवंडी देऊन पांघरून टाकण्याचे काम केले आहे. तीन आठवड्यापासून गावात दूषित पाणी पुरवठा सुरु आहे.

सुरुवातीला याकडे नागरिकांनी कानाडोळा केला. तालुक्यातील सर्वाधिक जल शुद्ध करण्याची क्षमता असूनही दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. गावातील सुज्ञ नागरिकांनी याबाबद सरपंच यांच्यासह पदाधिकारी यांना तोंडी सूचना दिल्या. पण दूषित पाणी येणे बंद झाले नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी स्थानिक प्रशासनावर रोष व्यक्त केला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *