चिखला जिल्हा परिषद क्षेत्रातील तिन्ही जलकुंभ कोरडे

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या हिरापूर हमेशा, मोहगाव खुर्द व शक्करधरा येथील जलकुंभ निधीची कमतरता व अर्धवट बांधकामामुळे या तिन्ही गावचे जलकुंभ कोरडे पडले आहेत. जल जीवन मिशन योजना पांढरा हत्ती ठरल्याचे सांगितले जात आहे. हिरापूर, मोहगाव खुर्द व सक्करधरा ही आदिवासी गावे आहेत. येथील नागरिकांची तहान भागविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत हर घर नल योजना सुरू करण्यात आली होती. दोन वर्ष लोटूनही जलकुंभाचे बांधकाम अर्धवट असल्याने जलकुंभ कोरडे असल्याचा प्रकार निदर्शनास आलेला आहे. यामुळे गावकºयांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

हिरापूर, मोहगाव खुर्द व सक्करधरा गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत या प्रशासकीय कामाला २०२१ मध्ये मंजुरी देण्यात आली असून २०२२ ला कायार्रंभ आदेश सुद्धा देण्यात आले आहे. यातयोजना पूर्ण करण्याचा कालावधी २०२३ असून आज दोन वर्षाचा कालावधी लोटूनही नागरिकांच्या दारात पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत आहे. तर याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचेही सांगितले जात आहे. धुटेरा ही गट ग्रामपंचायत आहे. सक्करधरा, घानोड, हिरापूर हमेशा व मोहगाव खुर्द या गावांचा समावेश असून यातील अंतर ८ ते १० किलोमीटरचा आहे. यात सक्करधरा व घानोड या गावचा अंतर मात्र दीड ते दोन किलोमीटरचा असल्यामुळे नवीन गट ग्रामपंचायतच्या निर्मितीची ओरड सुरू आहे. असे झाल्यास विकास कामाला गती मिळणार असल्याची शक्यता ग्रामवासियांनी वर्तवली आहे. सक्करधरा, घानोळ, हिरापूर हमेशा व मोहगाव खुर्द या गावचा प्रशासकीय कारभार धुटेरा ग्रामपंचायत मधून चालविला जात आहे. शासनाची कोणतीही योजना असेल तिच्यावर देखरेख करण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी गावाला भेट देत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. गावकºयांना लांब पल्ल्याचे अंतर गाठून आवश्यक कामे करावी लागत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *