
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणाºया डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. यात १७ कामगारांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या. मृतांमध्ये १४ महिलांसह ३ पुरुष कामगारांचा समावेश आहे. यात आणखी १८ कामगार भीषण गंभीर जखमी झाले. जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी मृतांच्या आकड्याला दुजोरा दिला. स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत अनेक कामगार गंभीररित्या भाजले आहेत.
जखमींपैकी १८ जणांना आॅरेंजसिटी रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारअनेकजण ५० टक्क्यांच्या वर भाजले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ७ ते ८:३० च्या सुमारास कंपनीच्या ‘१६-बी’ आणि ‘२०बी’ नॉनल क्रिम्पलिंग युनिटमध्ये एकामागून एक शक्तिशाली स्फोट झाले. घटना घडली त्यावेळी युनिटमध्ये ३६ कामगार उपस्थित होते. स्फोटांची तीव्रता इतकी भयानक होती की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. कारखाना परिसरात धुराचे लोट पसरले आणि सर्वत्र रक्तामांसाचा सडा पडला होता. सकाळी दुपारी १२ पर्यंत ढिगाºयाखालून १७ कामगारांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अशी आहेत मृतांची नावे
या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांची संख्या मोठी असून, अनेक जणी आपल्या कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्ती होत्या. मृतांमध्येगणेश टोंगे, प्रेमदास बागडे, राजू कुळमते, शोभा तपासे, पायल गजभिये, संगीत पंचभाई, अनुसया पाटील, दुर्गा गायकवाड, ज्योत्स्ना शेंडे, मयुरी येसकर, सुनंदा चिंचखेडे, सविता गणेश काळमेघ, गायत्री शेंडे, मीना ऊके, ज्योत्सना शेंद्रे यांचा समावेश आहे.
१८ जखमींची प्रकृती चिंताजनक
या स्फोटात १८ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीराचा मोठा भाग भाजला आहे. जखमींमध्ये प्रामुख्याने दुर्गामनोज धोटे (३१), वैशाली गणेश सतई (४०), सुगंधा विनायक रक्षित (५५), उषा रेवतकर (४३), काजल कोरती ( ३८), मनीषा धुर्वे (४२) , कविता ऊईके(४५) , ज्योती धुर्वे (२१) सुनीता ऊईके ( ३५), रंजना घागरे (३६ ), वैशाली धुर्वे (३०), सीमा धुर्वे (२७), रोशनी माटे (३२), रितु सलाम (२०), आम्रपाली काळसरपे (३५), दुर्गा सोतेरकर (४२), रोशनी दिपक मसराम( ३२), भारती शेंडे यांचा समावेश आहे.