
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडलात ‘राष्ट्रीय लाईनमन दिन’ अत्यंत उत्साहात आणि सुरक्षिततेच्या संकल्पासह साजरा करण्यात आला. कॉग्रेसनगर विभागात आयोजित कार्यक्रमात, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरणच्या तांत्रिक कर्मचाºयांनी आपले कर्तव्य निष्ठेने बजावतानाच आरोग्याची काळजी घेणे आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे, यावर विशेष भर दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सामूहिक ‘सुरक्षा शपथ’ घेऊन झाली.
यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी ध्वनी चित्रफीतीद्वारे लाईनमन बांधवांना दिलेल्या शुभेच्छा संदेशांचे प्रसारण करण्यात आले. अनेकदा अतिआत्मविश्वास किंवा शुल्लक निष्काळजीपणामुळे अपघात घडतात. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षा साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे.
आजचे युग हे स्मार्ट मीटर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. स्पर्धेच्या या काळात आपणही तंत्रज्ञानासोबत ‘स्मार्ट’ होणे गरजेचे आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, त्यामुळे स्वत:ला परिपूर्ण बनवा. असे आवाहन दिलीप दोडके यांनी यावेळी केले. मुख्य अभियंता यांनी कर्मचाºयांना ग्राहकांशी संवाद साधण्याचे आवाहन करताना सांगितले की, जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो, तेव्हा ग्राहकांना आपली प्रकषार्ने आठवण येते. अशा वेळी संयमाने परिस्थिती समजावून सांगून ग्राहकांचे समाधान करणे हे आपले कर्तव्य आहे. महावितरणमध्ये २०१३ पासून महिलांना ३० टक्के आरक्षण असल्याने महिला कर्मचाºयांचे प्रमाण वाढत असून, त्या पुरुषांच्या बरोबरीने महावितरणची प्रतिमा उजळत आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कॉग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचेसह दिलीप राऊत, कन्हैया सोमवंशी, लक्ष्मण वैरागडे, सचिन जांभुळकर, विद्या पठाडे, योगेश्वरी बाहे, अमोल धुलधर, रमेश वाटकर या तंत्रिक कर्मचा-यांसोबतच निलेश भगत आणि राहुल लांजेवार या अभियंत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सर्वांना लाईनमन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन कृतिका जोशी, प्रास्ताविक जयंत ठाकरे तर आभार प्रदर्शन अभिलाष बारापात्रे यांनी केले.कार्यक्रमाला विभागातील विविध स्तरावरील अधिकारी, अभियंते आणि तांत्रिक कर्मचाºयांची मोठी उपस्थिती होती.