
अभिमन ठाकरे /भंडारा पत्रिका लाखांदूर : रंगपंचमीच्या पावन पर्वावर लाखांदूर तालुक्यातील पाहूनगाव येथे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. राऊत परिवाराचे कुलदैवत असलेल्या गरदेवाच्या यात्रेनिमित्त गावात अक्षरश: भाविकांचा जनसागर उसळला. मनोकामना पूर्ण होण्याच्या अढळ विश्वासाने हजारो भक्तांनी गरदेव चौकात नतमस्तक होत नवस फेडले जातात . पाहूनगावातील ही परंपरा आजची नव्हे; तब्बल दोन शतकांची परंपरा चार पिढ्यांच्या अखंड श्रद्धेने आजही तेजोमय आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; मात्र गरदेवावरील विश्वासाचा दिवा आजही तेवढ्याच तेजाने प्रज्वलित आहे.