भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांच्या भाजीपाल्याची निर्यात थांबली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अमेरिका- इराण- इस्रायसल युद्धाची तीव्रता सातव्या दिवशीही कायम आहे. या आखाती देशातील युद्धाचा फटका भारतीय शेतकºयांना बसत आहे. युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजीपाला निर्यात थांबली आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. आखाती युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजीपाल्याच्या निर्यातीला ब्रेक आगला आहे. भंडारा जिल्ह्यातील भेंडी, मिरची व कारल्याची निर्यात थांबली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजीपाल्याच्या निर्यातीला जबर फटका बसला. यात मुख्यता भेंडी, कारले व मिरची आदीची नागपूर येथून विमानमार्गे निर्यात बंद पडली असून त्यामुळे बीटीबी येथे दररोज २० टन भाजीपाल्याची निर्यात थांबली आहे. खुल्या अर्थव्यवस्थेत जागतिक स्तरावर भाजीपाला व फळ उत्पादक शेतकºयांना युद्धाचा अप्रत्यक्ष फटका सहन करावा लागत आहे. समुद्रमार्गे व हवाईमार्गे प्रभावित ठरल्याने भारतातून निर्यात बंद पडली आहे. भंडारा येथून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भाजीपाल्याची निर्यात सुरू असताना अचानक सुरू झालेल्या युद्धामुळे बीटीबीभाजीमंडी प्रभावित झाली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *