अखेर १८ दिवसाच्या उपोषणानंतर प्रशासन नमले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नगर परिषद नगरपालिका व महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या विविध समस्याना वाचा फोडण्यासाठी विदर्भ नगर परिषद शिक्षक संघाने दि. १६ फेब्रुवारीपासून डीडी कार्यालयापुढे बेमुदत साखळी उपोषणाचे बंड पुकारले होते, याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी लावून उपोषणाकडे शासनाचे लक्ष वेधले, अखेर तब्बल १८ दिवसानंतर प्रशासन नमले आणि शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी शिक्षकांच्या मागण्या मंजूर करण्याचे उपोषणकर्त्या शिष्टमंडळाला लिखीत आदेश दिलें. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा तसेच गडचिरोली या जिल्ह्यातील नगर परिषद प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षकांचे नियमित वेतनासह इतर ३९ कोटीची थकीत देयके तसेच इतर आर्थिक लाभाची देयके सन २०२२ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पडून होती. शिक्षकांची प्रलंबित देयके निकाली काढण्यासाठी नगर परिषद शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र कार्यालयाने दखल घेतली नाही, त्यामुळे दि. १६ फेब्रुवारीपासून शिक्षकांनी बेमुदत साखळी उपोषण पुकारले आणि डीडी कार्यालयाने ठोस लेखी पत्र घेल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतली. त्यामुळे ५ मार्च रोजी डीडी कार्यालयाचे लेखाधिकारी लढ्ढा,पायल आवळेकर व कोहळे यांनी मागण्या मंजूर केल्याचे संघटनेच्या शिष्टमंडळाला आदेश दिले. यावेळी प्रमोद देशमुख, राजेश चावरे, सुनील दिक्षीत, विजय थुल, सुरेश गजबे, तिलकचंद मेहडोले, अविनाश राठोड, विजय येळणे, गोमासे इत्यादी उपोषणकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *