
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यातील मौजा लावेश्वर वळण ते लावेश्वर गाव रस्ता, मौजा दाभा ते पांजरा-बोथली रस्ता तसेच मौजा कोथुर्णा ते खैरी रस्ता या प्रमुख मार्गांच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी आज दि.१६ मार्च रोजी दाभा वळण भंडारा येथे रस्ता राको आंदोलन करण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने ३० दिवसांच्या आत सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनात परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. आवळे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डी. एल. बिसेन, भंडारा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य सौ. गायत्री वाघमारे, पंचायत समिती सदस्य पंकज लांबट, उपसरपंच संदीप पिंगळे, उपसरपंच दीपक खंडाळे, उमेश मोहतुरे, माजी सरपंच सौ. अर्चना गणेश काळे, उपसरपंच उमेश सार्वे, खैरीचे सरपंच मुलचंद ईश्वरकर,प्रभा संदीप काळे, फुलचंद झंझाड, गांधी काळे, मंगेश हिंगे, जितु लांबट, गुलाब तिजारे, अमित हुमने, शामराव उताणे, अश्विन शहारे, विक्की काळे, मुरलीधर उताणे, पंकज उके रुपेश गणवीर, छगन गणवीर, महेश मोहरकर, भुवनेश्वर जांभूळकर, पिंटू ईश्वरकर,इर्शाद शेख, राहुल ईश्वरकर यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.