दुभाजकाला दुचाकीची धडक, युवकाचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : मोटर सायकल मालकी किराणा दुकानासाठी लागणाºया किराणा साहित्याची खरेदी करून स्व:गावी परत जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकी सोबत अन्य दुचाकीची धडक झाल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना १५ मार्च रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मडेघाट फाटा येथे घडली. मोहन जयप्रकाश शहारे (२५) रा. चप्राड असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे. सविस्तर असे की, मोहन शहारे यांचे चप्राड येथे किराणा दुकान आहे. या किराणा दुकानातून विविध किराणा साहित्याची विक्री केली जाते. मात्र या किराणा दुकानात लागणाºया साहित्य लाखांदूर येथील मोठ्या दुकानातून खरेदी करून आणले जाते.

घटनेच्या दिवशी रात्री ८ वाजताच्या सुमारास मोहन मालकी दुचाकीने चप्राड येथून लाखांदूर लाकिराणा साहित्याची खरेदी करण्यासाठी आला होता. त्याने साहित्य पकडण्यासाठी गावातीलच एका १७ वर्षीय युवकाला पकडले होते. साहित्य घेऊन स्वगावी परत जात असताना डिव्हायडरवर अन्य एका दुचाकिने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहनचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मागे बसलेल्या १७ वर्षीय युवकाने अपघात करणाºया दुचाकी चालकाला विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत असल्याने व कुठलेही इंडिकेटर अथवा हॉर्न न दिल्याबाबद हटकले मात्र त्याने काही न ऐकता घटनास्थळावरून दुचाकीसह पळ काढला.

ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मोहनला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मृत घोषित केले. घटनेतील मृतक मोहन हा घरचा प्रपंच चालवत होता. त्याला मोठा भाऊ असून तो शहरात एका कंपनीत काम करण्यासाठी गेला आहे. घरी आई वडील असून त्यांचे कुटुंब हे भूमिहीन आहे. रोजगाराचे साधन नसल्याने व कुटुंब चालवायचे असल्याने मोहन मागील काही वर्षांपासून किराणा दुकान चालवत होता. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *