शहरातील भेडसावणाºया समस्या प्राधान्याने सोडवू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शहर हद्दीत येणाºया सिहोरा मार्गावर सध्या समस्यांनी घर केले आहे. स्थानिकांच्या तक्रारी व त्यावर उपाय योजनेच्या उठणाºया शाब्दिक मागण्यांवर तुमसर पालिकेचे उपाध्यक्ष सचिन बोपचे सध्या सरसावले आहेत. आपल्या दालनांत स्थानिकांच्या प्रत्येक समस्यांना बोपचे सध्या प्राधान्य देताना दिसत आहेत. याचाच भाग असलेल्या सिहोरा महामार्गावर डोंगराला स्मशान भूमी दरम्यान दुर्लक्षित झालेल्या विसावा परिसरात बोपचे यांनी व्यक्तिश: उपस्थित राहून स्वच्छ्ता अभियान राबवून घेतले. तसेच त्या ठिकाणी नियमित रित्या सफाई कामगारांना तत्पर राहण्याच्या सूचना देखील त्यावेळी बोपचे यांनी दिल्या.

सदर कर्तव्य बजावून उपाध्यक्षांनी समस्या तथा तक्रारींना निवेदनापुर्ते मर्यादित न ठेवता त्याचे कृतीबद्ध नियोजन आखून स्थायी उपाय योजना राबविण्यावर भर देण्याचा मानस बोपचे यांनी त्यावेळी व्यक्त केला आहे. त्यात सध्या नगर पालिका तुमसर येथे नवीन विकास कामांचा आराखडा अद्याप मांडण्यात आलेला नाही. मात्र येत्या निकट काळात विकास कामांना चालना देणारे उपक्रम, शहराची प्रगती, नित्य भेडसावणाºया समस्या, मोठे प्रकल्प देखील हाती घेणार असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले. नगर पालिकेच्या दुसºयाकार्यकाळात सचिन बोपचे यांना सभापतीसह उपाध्यक्षांचे पद लाभले आहे. त्यातून शहरातील नागरिकांच्या मागण्या, त्यांच्या गरजा, मूलभूत सुविधा, कामांचा तथा गरजांची पूर्तता करता यावी याकरिता पालिकेत बोपचे यांनी आपले स्वतंत्र दालन सर्वसामान्यांकरिता नेहमीच खुले असल्याचा दावा केला आहे. पालिकेत येताना कुठल्याही अडचणी आल्यास, कामांत अडथळा आल्यास थेट भेट देऊन त्याच्याशी अवगत करण्याची जनतेला बोपचे यांनी विनंती केली आहे. त्यातूनच बोपचे यांच्या दालनातील गर्दी आणि भेटणाºयांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याची चर्चा शहरात सर्वदूर केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *