
लाखांदुर : तालुक्यातील तई येथील एका २५ वर्षीय युवकाचा पुणे येथे भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . ही घटना १४ मार्च रोजी रात्रीला घडली. प्राप्त माहितीनुसार तई येथील प्रदीप भाऊराव कामटे वय (२५) हा युवक गेल्या अनेक वर्षापासून एका हॉटेलमध्ये पुणे येथे कर्मचारी म्हणून काम करीत होता .
शनिवारी रात्री उशिरा तो आपल्या रूमकडे परत जात असताना एका चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली . ही धडक इतकी भीषण होती की प्रदीप कामटे यांचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान या अपघाताची माहिती साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांना मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ पुणे येथून मृतदेह तई गावात आणण्यासाठी स्वखर्चातुन रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. प्रदीप कामटे हा आपल्या कुटुंबातील धाकटा मुलगा होता . त्यांच्या पश्चाताप आई,वडील आणि दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.