७ अधिकाºयांवर बडतर्फ तसेच निलंबनाची कारवाई!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीत शिरकाव करणाºया भंडारा महसूल प्रशासनातील ७ अधिकाºयांवर बडतर्फ तसेच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. महसूल विभागातील एकूण २२ दिव्यांग कर्मचाºयांच्या प्रमाणपत्रांची नागपूर वैद्यकीय मंडळामार्फत पुनर्तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ७ अधिकाºयांची प्रमाणपत्रे बोगस निष्पन्न झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा ठपका ठेवत तीन अधिकाºयांना बडतर्फ तर तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. शिवाय एका नायक तहसीलदाराला बडतर्फ करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी लाटणाºयावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी मागील तीन वर्षांपासून लावून धरली होती. क्षीरसागर यांच्या तक्रारीच्या आधारे भंडारा जिल्ह्यातील शासकीय नोकरी मिळविलेल्या ३२२ दिव्यांगांसह प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू झाली. या पुनर्तपासणीतून दिव्यांगत्व जास्त दाखविणे, दिव्यांग नसताना बोगस प्रमाणपत्राआधारे नोकरी मिळविणाºया बोगस दिव्यांगांचा पदार्फाश होण्यास सुरुवात झाली आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकºया आणि पदोन्नती लाटण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आणले.

जिल्ह्यात महसूल विभागात कार्यरत असलेल्या २२ दिव्यांगांपैकी ७ जणांनी दिव्यांगात्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाले असून त्यावर प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस दिव्यांगांचे धाबे दणाणले आहेत. महसूल प्रशासनातील तीन तलाठी, एक मंडळ अधिकारी, दोन सहाय्यक महसूल अधिकारी तसेच एक नायब तहसीलदार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भंडारा नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांना बडतर्फ करण्यात यावे असा प्रस्तावजिल्हा निवड समितीच्या वतीने शासनाला पाठवण्यात आला असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी प्रतिनिधीला दिली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *