
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना निसर्गाशी प्रत्यक्ष जोडणे, जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे, पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नवेगावनागझिरा व्याघ्र प्रकल्पाबद्दल मूलभूत माहीती देणे याउद्देशाने आॅक्टोबर २०२५ “चितमपल्लींची निसर्ग शाळा” निसर्ग शिक्षण उपक्रम व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील १६ जिल्हा परिषद शाळेतील ४८१ विद्यार्थ्यांकरीता सुरु करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये महिन्यातुन एक दिवस विद्यार्थ्यांना क्षेत्रीय भेटी, जंगल सफारी, निसर्ग फेरी, वन्यजीव निरीक्षण, तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली.
या करीता निसर्ग मंडळ गोंदिया, हिरवळ बहुउद्देशिय संस्था गोंदिया आणि रएअळ ठॠड भंडारा या सह त्यांचे प्रतिनीधी यांचे सहकार्य लाभले आले. व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी/संर्वधन तज्ञ / पशुवैद्यकीय अधिकारी / जीवशास्त्रज्ञ / फफळ सदस्य वनअध्यापक म्हणुन आपली भूमिका बजावली. या उपक्रमाचा समारोपीय सोहळा श्रीमती पियुषा जगताप, उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली दि. २३ मार्च २०२६ रोजी बाजीराव करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी, साकोली येथे सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, प्रतिनीधी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, निवडक विद्यार्थ्यांचे उपस्थितीत पार पडला. सोहळयात वन्यजीव अभ्यासक लेखक विनोद शंकर भोवते, लिखीत नवेगाव ठॠड नागझिरा व्याघ्र प्रकल्प प्राणी जीवन या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, प्रतिनीधी, क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांनी आपले अनुभव मांडले. तसेच ठॠड निवडक विद्यार्थ्यांनी विविध प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज काढणे, पर्यावरणावर गीत सादर करीत त्यांच्यातील गुण प्रर्दशन केल्याबद्दल विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देवून गौरविण्यात आले.