अतिक्रमण करून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भोजापुर ग्राम पंचायत अंतर्गत येणाºया पाटबंधारे विभागाच्या बुडीत क्षेत्रात येणाºया शासकीय जागेवर माती-मुरूम वापरून जागा हडप करण्याचा प्रयत्न करणाºया संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी तसेच सदर जागा मोकळी करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे अशी मागणी भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदनानुसार, भंडारा तालुक्यातील ग्राम भोजापुर येथील गट क्र. २०२ वर माती-मुरूम चे भरणा करण्यात आले आहे.या प्रकरणी उपविभागीय अधिकारी भंडारा यांनी सदर गटाची चौकशी केली असता हा संपूर्ण गट गोसे खुर्द बुडीत क्षेत्रामध्ये संपादित करण्यात आला आहे.

सदर गट क्रमांक मधील गट क्रमांक २०२/३/१ व २०२/३/२ आणि गट क्रमांक २०२/३ याची मौका चौकशी केली असता गट क्रमांक २०२/३/१ व २०२/३/२ यावर टाइल्स व कडप्पा यांची दुकान लावण्यात आली असुन असून तलाठी रेकॉर्डनुसार सदर दोन्ही गट विजयकुमार चेतनलाल बलवानी यांच्या नावाने असून सदर क्रमांक हा गोसीखुर्द बुडीत क्षेत्रात येत असून संपादित झालेला आहे. व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या नावाने खरेदी खत सुध्दा झालेला आहे. परंतु अजून पर्यंत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या नावाने फेरफार झालेला नाही .

गट क्रमांक २०२/३ हा संपादन करण्यापूर्वी सत्यनारायण मिश्रीलाल व्यास यांच्या नावाने होता. थेट खरेदी विक्री झाल्यानंतर सदर गट क्रमांक हा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या नावाने आहे. सदर जागा ही सरकारी असून संबंधित अधिकाºयांच्या भ्रष्टाचारामुळे या जागेवर अतिक्रम करून करोडो रुपये किमतीची सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडुन केला जात आहे. सदर जागाही गोसेखुर्द धरणाची असून ती सरकारची मालमत्ता आहे करीता त्या जागेवर होत असलेले अतिक्रम तत्काळ हटविण्यात यावे तसेच सरकारी जागेवर करण्यात आलेले मातीमुरूम चा भरणा कुठून आणण्यात आला याची चौकशी करून शासनाची जागा हडप करण्याचा प्रयत्न करणाºया वक्तिवर कारवाही करण्यात यावी तसेच सदर जागेवर झाडे लावण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद चंद्र पवार गट) वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष गितेश ठोंबरे, निलेश बनपुरकर, संदीप सार्वे, सचिन बनपुरकर, चंद्रशेखर भिवगडे ,सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे आदि उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *