२३ गोवंशाची सुटका, ११ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी पोलीसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाºया ट्रकवर कारवाई करीत २३ गोवंशाची सुटका करीत ११ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई दि.२४ मार्च २०२६ रोजी ओमकार सेलिब्रेशन हॉल लाखनी परिसरात करण्यात आली. लाखनी पोलीसांना २४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास लाखनी परिसरातुन अवैधपणे जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती लाखनी पोलीसांना मिळाली. त्या आधारे लाखनी पोलीसांनी पोलीस उपनिरीक्षक सुदाम कांबळे,पोलीस नाईक श्रीकांत वाघाये व पोलीस शिपाई भूपेश हटवार यांनी ओमकार सेलिब्रेशन हॉल लाखनी समोर येथील नाकाबंदी केली असता पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच ३४,एबी ९७८२ लाा थांबवून ट्रकची पाहणी केली असता ट्रकचे मागील भागात गोवंश जातीची २३ जनावरे चारापाण्याची व्यवस्था न करता दाटीवाटीने दोरीचे साह्याने बांधलेले दिसून आले. त्यापैकी एका जनावराचा मृत्यू झाला होता.

ट्रकचालक शितल सिंग रामलखन राठोड व ४२ वर्ष रा. विनोबा भावे नगर नागपूर याला ट्रक मधील जनावरांच्या वाहतुक संदर्भातील परवान्या बाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा कारवाई करून मिळून आलेले गोवंश जातीचे जनावरे ध्यान फाउंडेशन गराडा येथे पाठविण्यात आली. पोलीसांनी ट्रक चालक शितलसिंग राम लखन राठोड याचे विरूध्द विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करीत ११ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार प्रतीक बरोबर हे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधिक्षक नुरल हसन , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांचे मार्गदर्शनात लाखनी पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक सुदाम कांबळे, पोलीस नाईक श्रीकांत वाघाये, पोलीस शिपाई भूपेश हटवार, चालक पोलीस शिपाई राजेश पटले यांनी केलेली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *