
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर काही जलदगती ट्रेनचे थांबे मिळावेत अशी मागणी घेऊन भंडारा जिल्हा रेलयात्री सेवा समिती भंडाराच्या पदाधिकाºयांनी केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली व मागणीचे निवेदन सादर केले. रेलयात्री समितीचे रमेश सुपारे, वरियलदास खानवानी व सुरेश फुलसुंगे यांनी ना. गडकरी यांच्याशी चर्चा करतांना सांगितले की, मागील अनेक वर्षापासून ट्रेनच्या समिती काही जलदगती ट्रेनचे थांबे मिळावेत म्हणून प्रयत्न करीत आहेत. यासंबंधी अनेकदा रेल्वे बोर्ड, भंडाºयाचे खासदार, विभागीय व्यवस्थापक, महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदन देवूनही त्यावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही व थांबेही मिळाले नाहीत. त्यामुळे भंडारा जिल्हयातील रेल्वे प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.
भंडारा जिल्ह्यात सात तालुके असून रेल्वे प्रवाशांना भंडारा रोड रेल्वे स्टेशनवरूनच प्रवास करावा लागतो. परंतु अनेक द्रुतगती ट्रेनचे थांबे नसल्याने त्यांना नागपूर किंवा गोंदिया येथे जावून पुढचा प्रवास करावा लागतो. स्थानिक जनप्रतिनिधी या बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. रेल्वे मंत्रालय किंवा रेल्वे बोर्डाकडे ट्रेनच्या थांब्याबाबत पाठपुरावा करण्यात स्थानिक जनप्रतिनिधी अपयशी ठरत असल्याने जिल्हयातील रेल्वे प्रवाशांत असंतोष पसरला आहे. ना. गडकरी यांना दिलेल्या निवेदनात बिलासपूर-पुणे एक्सप्रेस, हटीया-लोकमान्य टर्मिनल, हटिया-पुणे, पुरी-शिर्डी, दरभंगा-हैद्राबाद, ज्ञानेश्वरीहावडा लोकमान्य तिलक एक्सप्रेस, बिलासपूर-एणार्कुलम एक्सप्रेस या ट्रेनचे थांबे मिळावेत तसेच काही ट्रेनचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी रेल्वे समिती पदाधिकाºयांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाºयांना रेल्वे मंत्र्यांना ताबडतोब पत्र पाठविण्याचे निर्देश दिले. रेल्वे यात्री समिती यापुढेही आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करीत राहील असे समितीने सांगितले.