श्रीकांत तुमसरे गुरुजी यांना विदर्भस्तरीय उत्कृष्ट कलावंत,लेखक व दिग्दर्शक पुरस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीने आज पर्यंत अनेक कलावंत घडवले आहेत. कलावंताची खरी मेहनत दिसून येते ती रंगमंचावर आणि कलावंतांच्या कलेची जाण ठेऊन त्यासाठी मंच निर्माण करून देणारे हे अद्वितीयच असतात.आनंदयात्री समूहाने नाट्यकला अजरामर ठेवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.आनंदयात्री एकांकिका करंडक २०२६ बी.आर.ए.मुंडले हॉल नागपूर या ठिकाणी दि.१८ एप्रिल २०२६ रोज शनिवारला विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत सरगम नाट्यरंगभूमी भंडारा प्रस्तुत “भाग्यचक्र”ही एकांकिका सादर करण्यात आली.या एकांकिकेमध्ये प्रमुख भूमिकेत श्रीकांत तुमसरे, निलेश पोटफोडे,अतुल कानतोडे, सौ त्रिवेणी तुमसरे,सौ ज्योती घोनमोडे तसेच बालकलावंत म्हणून अथांग तुमसरे व अद्विका तुमसरे हे होते.या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन श्रीकांत प्रेमलाल तुमसरे यांनी केले.तर संगीत व प्रकाशयोजना श्री प्रकाश भोयर यांनी केली.

या संपूर्ण स्पर्धेत विदर्भातुन एकूण सहा एकांकिका सादर करण्यात आल्या.त्यात भाग्यचक्र या एकांकिकेची रसिक मनावर विशेष छाप पाडली.कालवंतांची अभिनयकला बघून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला तसेच भावुक प्रसंगाने तर प्रेक्षकांचे डोळे पाणावले.एकांकिका बघतांना सभागृहात निरव शांतता पसरली होती.नाटक संपताच प्रेक्षक सर्व कालवंतांचे कौतुक करायला परस्पर भेटायला आले.या एकांकिकेसाठी शिवाजी राजे भोसले कुटुंबाचे वंशज श्री.मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते श्रीकांत तुमसरे गुरुजी यांना विदर्भस्तरीय उत्कृष्ट अभिनय पुरस्कार तसेच ,उत्कृष्ट दिग्दर्शक व उत्कृष्ट लेखक असे तीन पुरस्कार प्राप्त झाले असून संगीत योजनेसाठी प्रकाश भोयर यांना पुरस्कार देण्यात आले.उपस्थित पाहुण्यांनी व प्रेक्षकांनी सर्व कलावंतांचे कौतूक केले व सर्व कलावंतांनी आनंदयात्री समूहाचे आभार मानले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *