साकोली तलाव पुर्नबांधणीसाठी शेतकºयांचे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरालगतचा महत्त्वाचा तलाव ९ आॅगस्ट २०२५ रोजी फुटून तब्बल नऊ महिने उलटले तरी अद्याप शासनाकडून पुनर्बांधणीस मंजुरी न मिळाल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालयासमोर शेतकºयांनी आंदोलन करत तलावाच्या पाळीची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावेळी अ‍ॅड. मनीष कापगते, नगराध्यक्षा देवश्री कापगते, नगरसेवक सपन कापगते, नगरसेवक सोनू बैरागी यांच्यासह शेतकरी विष्णू कापगते, मोरेश्वर गाणे, अमित लांजेवार व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार निलेश कदम यांना निवेदन देऊन शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी केली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तलावाची दुरुस्ती न झाल्यास आगामी पावसाळ्यात पाणी साठवणूक होणार नाही, परिणामी शेकडो एकर शेती पडीत राहण्याचा धोका आहे. यामुळे शेतकºयांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होऊन आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तहसीलदारांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव लवकरात लवकर मंजुरीसाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, शेतकºयांनीही तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *