जिल्हाधिकाºयांच्या हस्तक्षेपामुळे वृक्षतोडीला ‘ब्रेक’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ‘अपरिहार्य गरज सिद्ध केल्याशिवाय व सखोल तांत्रिक पडताळणीशिवाय एकही झाड तोडले जाणार नाही,’ असे निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प व्यवस्थापनाला दिले. पर्यावरणप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत घेतलेल्या तातडीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

शतकजुनी वृक्षसंपदा संकटात..

फुलमोगरा ते कारधा या मार्गावर कडुलिंब, सागवान, चिंच, पिंपळ, करंजी, बाभूळ, आंबा, सिसम यांसारखी सुमारे १०० ते १५० वर्षे जुनी, डौलदार वृक्षसंपदा उभी होती. या झाडांनी केवळ पर्यावरणीय संतुलन राखले नाही, तर अनेक दशकांपासून प्रवाशांना सावलीही दिली. या पट्ट्यातील एकूण ११२ झाडांपैकी आतापर्यंत ४५ झाडांची तोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

पर्यावरणप्रेमींचा दबाव; प्रशासनाचा तत्काळ प्रतिसाद…

वृक्षतोडीच्या विरोधात स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. ‘विकासाच्या नावाखाली निसगार्ची हानी थांबवावी,’ अशी ठाम मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी तातडीची बैठक बोलावून संबंधित प्रकल्प अधिकाºयांना जाब विचारला आणि परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.

विकास आणि पर्यावरण यांचा समतोल आवश्यक आहे

जिल्हाधिकाºयांच्या निर्देशांमुळे पुढील वृक्षतोडीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

रस्ता रुंद की पर्यावरण संकुचित?

महामार्गाचे चौपदरीकरण हा विकासाचा भाग असला, तरी शतकानुशतके उभ्या असलेल्या वृक्षसंपदेचा नाश हा गंभीर मुद्दा ठरत आहे. ही झाडे केवळ सावली देणारी नसून, तापमान नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. तज्ज्ञांच्या मते, रस्त्याच्या आराखड्यात सूक्ष्म बदल करून किंवा नियोजनपूर्वक उपाययोजना करून अनेक झाडे वाचवता आली असती. यावेळी डॉ.नितीन तूरस्कर, चंदू वंजारी, चंद्रशेखर भिवगडे, प्रमोद केसलकर, प्रवीण मेहर, मोहम्मद सईद शेख, आबिद सिद्दिकी, प्रणय बडवाईक, वैभव चोपकर, सदानंद इलमे, हिवराज उके, नितीन कुथे, हेमंत साकुरे, कविता नागापुरे, विजय निचकवडे निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *