
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (ऋररअक) नियमानुसार, फळे पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर करणे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून तो कायद्याने शिक्षापात्र गुन्हा आहे. त्यामुळे फळे पिकवण्यासाठी जर कोणी हानिकारक रसायनांचा वापर करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अमृता शिर्के यांनी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व फळ व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि शीतगृह मालकांना कळविण्यात येते की, उन्हाळ्याच्या हंगामात आंबे, केळी, पपई आणि चिकू यांसारख्या फळांची मागणी लक्षणीय वाढते. प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, वाढलेल्या ग्राहक मागणीचा फायदा घेऊन काही व्यापारी फळे कृत्रिमरित्या आणि वेगाने पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बाइड’ नावाच्या प्रतिबंधित रसायनाचा वापर करीत आहेत.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (ऋररअक) नियमानुसार, फळे पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर करणे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून तो कायद्याने शिक्षापात्र गुन्हा आहे. कायदेशीर तरतुदी आणि प्रशासकीय भूमिका : ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६’ (एफएसएसए कायदा) च्या कलम २६ अन्वये, असुरक्षित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे. या संदर्भात, प्रशासन पुढीलप्रमाणे कठोर उपाययोजना करत आहे. तपासणी मोहीम: जिल्हाभरातील फळ बाजार, गोदामे आणि शीतगृहांची तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाºयांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नमुने घेणे: संशयास्पद फळांचे नमुने तात्काळ जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील. कायदेशीर कारवाई: कोणत्याही व्यापाºयाच्या गोदामात किंवा दुकानात प्रतिबंधित रसायने (कॅल्शियम कार्बाइड) किंवा रासायनिक प्रक्रिया केलेली फळे आढळल्यास, संबंधित व्यक्तीविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा (एफआयआर) दाखल केला जाईल. याव्यतिरिक्त, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, ज्यामध्ये परवाना रद्द करण्यापासून ते तुरुंगवासापर्यंतच्या तरतुदींचा समावेश आहे.
रसायनांचे आरोग्यावरील परिणाम: कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरससारखे विषारी पदार्थ असतात. या रसायनांचा फळांशी थेट संपर्क आल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर खालील दुष्परिणाम होऊ शकतात. पचनसंस्थेवर होणारा परिणाम: पोटदुखी, उलट्या, अतिसार आणि तीव्र मळमळ.
गंभीर विकार: यकृत, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेच्या कार्यावर कायमस्वरूपी दुष्पपरिणाम. दीर्घकालीन धोका: या रसायनांच्या नियमित सेवनाने कर्करोगासारख्या असाध्य रोगांचा धोका निर्माण होतो. ग्राहकांसाठी जागरूकता आणि खबरदारी: प्रशासनाने नागरिकांना फळे खरेदी करताना ‘अन्न सुरक्षे’ बाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रासायनिक प्रक्रिया केलेली फळे ओळखण्यासाठी पुढील बाबींचे निरीक्षण करा. रंग आणि पोत: रासायनिक प्रक्रिया केलेली फळे एकसारखी पिवळी दिसतात, जे नैसर्गिक नाही. नैसर्गिक फळांमध्ये रंगांच्या (छटांच्या) छटांचे मिश्रण असते. सुगंध: रासायनिक प्रक्रिया केलेल्या फळांमध्ये फळांचा मूळ नैसर्गिक सुगंध नसतो.
स्वच्छता: ग्राहकांनी बाजारातून आणलेली फळे स्वच्छ आणि कोमट पाण्यात किमान ३० ते ६० मिनिटे भिजवून ठेवावीत. शक्य असल्यास, फळांच्या पृष्ठभागावरील रासायनिक अंश काढून टाकण्यास मदत होण्यासाठी पाण्यात थोडे मीठ किंवा खाण्याचा सोडा मिसळा. व्यापाºयांसाठी सूचना: सर्व व्यापाºयांनी आपली फळे साठवताना नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करावा. फळे पिकवण्यासाठी इथिलीन गॅसचा अधिकृत आणि नियंत्रित प्रमाणात वापर करावा, जो ऋररअक ने प्रमाणित केला आहे. कॅल्शियम कार्बाइडचा वापर हा एक ‘अक्षम्य गुन्हा’ आहे, सर्व व्यापाºयांनी याची गंभीर नोंद घ्यावी. प्रशासनाचे ध्येय : गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित आणि निर्भेसळ अन्न उपलब्ध करुन देणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. नागरिकांनी फळांमध्ये रासायनिक वापराबाबत कोणतीही तक्रार असल्यास, त्वरित जिल्हा अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा. आपली तक्रार गोपनीय ठेवली जाईल, असे सहायक आयुक्त (अन्न) अमृता शिर्के यांनी कळविले आहे.