
भंडारा पत्रिका/वार्ताहर पालांदूर : लगतच्या गट ग्रामपंचायत कवलेवाडा येथे प्रभाग क्रमांक दोनची पोटनिवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात होते. यामध्ये यादवराव नीलकंठ बडोले यांनी १९४ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय संपादन केला. माजी सदस्य हरिदास बडोले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर निवडणूक विभागाच्या वतीने पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत भाऊराव महादेव बडोले, यादवराव नीलकंठ बडोले आणि रणजीत सुरेंद्र वालदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतमोजणीनंतर यादवराव बडोले यांचा विजय निश्चित होताच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला यामुळे कवलेवाडा गट ग्रामपंचायत हद्दीतील कवलेवाडा, मेंगापूर, पहाडी, कवडसी, खैरी या गावांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उमेदवाराच्या विजयासाठी गट ग्रामपंचायत कवलेवाडाचे उपसरपंच स्वप्निल खंडाईत आणि त्यांच्या सहकाºयांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.