
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातील डॉ. जाकीर हुसेन वार्ड येथे नुकतेच गोमास विक्री प्रकरण उघड होऊन याच आरोपीतांना डिसेंबर २५ मध्ये अशाच प्रकरणात अटक होऊन त्यांचा कत्तलखाना सिल करण्यात आला असतानाही त्याच परिसरात गोमास विक्री होत असल्याने हिंदू संघटनांचे माहिती वरून तिरोडा पोलिसांनी तिन आरोपींना अटक करून कार्यवाही केली असलीतरी या संवेदनशील प्रकरणात शहर विभागात नियुक्त पोलीस कर्मचाºयांकडून हयगय झाल्याचा संशयावरून अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशावरून चार कर्मचाºयांना पोलीस मुख्यालय गोंदिया येथे सेवा संलग्न करण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ माजली आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये गोमास विक्री तसेच गोवंशीय जनावरांना निर्दयतेने बांधून ठेवल्याचे प्रकरण तिरोडा शहरात डिसेंबर २०२५ मध्ये उघड झाल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून या प्रकरणावरुन सामूहीक हनुमान चालीसा वाचन, तिरोडा शहर बंद व आंदोलनाचे प्रकार घडले होते. त्यावेळी तिरोडा पोलीस व नगरपरिषद तिरोडा तर्फे हा कत्तलखाना सील करण्यात आला होता मात्र यातील आरोपीतांनी याच परिसरात परत गोमांस विक्री करीत असल्याचे ३ मे रोजी उघड झाल्याने या प्रकरणाची माहिती हिंदू संघटनेतर्फे तिरोडा पोलिसांना दिल्याने तिरोडा पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेऊन कार्यवाही केली.
मात्र या प्रकरणी तिरोडा शहरात नियुक्त असलेले पोलीस कर्मचाºयांकडून हयगय झाल्याच्या शक्यतेवरून अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांचे आदेशावरून तिरोडा पोलीस स्टेशनचे हवालदार ब्रिजेश मडावी, नितेश बावणे , शिपाई शैलेश दमाहे व विकी धांडे यांची सेवा गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालय कारंजा येथे संलग्न करण्याचे आदेशावरून या चारही कर्मचाºयांना पोलीस स्टेशन तिरोडा येथून ७ मे रोजी मुख्यालयात हजर होण्याकरता कार्यमुक्त करण्यात आल्याची चर्चा पोलीस स्टेशन तिरोडा येथे आहे. या प्रकरणामुळे तिरोडा पोलीस स्टेशन सह गोंदिया जिल्हा पोलिस विभागात खळबळ माजली आहे.