
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहिर केलेल्या एसएससी (दहावी) बोर्ड परीक्षेच्या निकालांत भंडारा येथील नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी परत एकदा आपले वर्चस्व कायम ठेवत जिल्ह्यात प्रथम तीनही क्रमांक नूतनच्या विद्यार्थिनींनी पटकाविले आहेत. अंजली सुनील काळे हिने ५०० पैकी४९७ गुण प्राप्त करत ९९.४० टक्क्यांसह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला असून वैनगंगा विद्यालय पवनी येथील श्रावणी राजेंद्र ठोंगसे हिने ९७.८० गुण प्राप्त करत जिल्ह्यात दुसरी येण्याचा मान मिळविला तसेच हयासिंथ हाय स्कूल लाखनीच्या मेहुल पटले याने ९७ टक्के गुणांसह जिल्ह्यात तृतीय स्थान प्राप्त केले आहे.
मराठी पेक्षा इंग्रजी सरस यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेतइंग्रजी हा किलर सब्जेक्ट ठरला होता पान माध्यमिक शालांत परीक्षेत सर्वच भाषविषयांपेक्षा इंग्रजी (प्रथम भाषा) हा विषय सरस ठरला असून इंग्रजीप्रथम भाषेचा निकाल ९८.८८ टक्के लागला असून इंग्रजी तृतीय भाषेचा निकाल ८९.४९ टक्के लागला आहे. त्या तुलनेत मराठी प्रथम भाषेचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ८८.७४ टक्के लागला आहे. हिन्दी प्रथम भाषेचा निकाल ८९.८५ टक्के तसेच हिन्दी द्वितीय भाषेचा निकाल ८९.४८ आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान, निकालाबाबत शंका असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची प्रत घेणे अनिवार्य करण्यात आले असून विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीत आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.