
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील चारगाव फाटा परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात साकोली तहसील कार्यालयात कार्यरत महसूल सेवक प्रदीप सेगोजी उके (वय ६०, रा. परसोडी) यांचा दुदैवी मृत्यू झाला, तर युवराज शिवराम बनकर (वय ५५, रा. परसोडी-सौंदड) हे गंभीर जखमी झाले आहेत. सातलवाडा येथील बारसाच्या कार्यक्रमावरून दोघेही मोटारसायकलने परत येत असताना भरधाव ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
मात्र प्रदीप उके यांचा भंडारा येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. गंभीर जखमी युवराज बनकर यांच्यावर भंडारा येथील चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील चारगाव फाटा जवळ घडली. प्रदीप उके व युवराज बनकर हे मोटारसायकल क्रमांक एमएच ४० ०८९८ ने सातलवाडा येथून परसोडीकडे जात होते. त्यावेळी ट्रॅव्हलर क्रमांक ङअ ०२ अछ ८२५७ च्या चालकाने वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व हयगयीने चालवत मोटारसायकलला मागून धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिस- अव रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी राहुल युवराज बनकर (वय २८, रा. परसोडी-सौंदड) यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिस ठाण्यात आरोपी ट्रॅव्हलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी कायम अप क्रमांक ४२७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडुळे करीत असून पोलीस हवालदार युवराज बरकडे यांनी दाखल प्रक्रिया पार पाडली. दरम्यान, प्रदीप सेगोजी उके हे साकोली तहसील कार्यालयात महसूल सेवक म्हणून कार्यरत होते. मनमिळाऊ स्वभाव, सर्व कर्मचाºयांशी मधुर संबंध आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे ते तहसील कार्यालयात सर्वांच्या परिचयाचे व आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनाची बातमी समजताच तहसील कर्मचारी व महसूल विभागात शोककळा पसरली. अनेक सहकाºयांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करत एका कर्तव्यदक्ष व सहृदय कर्मचाºयाला गमावल्याची भावना व्यक्त केली.