त्रिमुर्ती चौक ते पांडे महाल रस्ता दुरूस्त करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा शहरातील त्रिमुर्ती चौक ते मुस्लीम लायब्ररी चौक ते अण्णाभाऊ साठे चौक ते पांडे महाल या महत्त्वाच्या रस्त्याचे त्वरित डांबरी करण करावे, अशी मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून विकासाच्या नावावर नळवाहीनी, सिव्हेज पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आले. परंतु त्यानंतर रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी न केल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर शाळा, कॉलेज, तहसील कार्यालय, मंगल कार्यालय आणि व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने दिवसभर मोठी वर्दळ असते.

शेकडो चारचाकी, दुचाकी, सायकलस्वार आणि पादचारी या मार्गाचा वापर करतात. खोदकामामुळे उडणाºया धुळीचा आणि पडलेल्या खड्ड्यांचा त्रास वाहनधारक, नागरिक आणि दुकानदारांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून मोठी वाहने गेल्यास धुळीचे लोट उठतात त्यामुळे लहान वाहनधारक व पादचाºयांना, दुकानदारांना श्वसनाचे आजार होण्याची भीती आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. राज्य सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधीनीं विकास कामाच्या नावावर दोन-दोन, चार-चार वर्षे जनतेला वेठीस धरू नये, ह्या विकासातून कुणा कुणाचा विकास होतो हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे त्रिमूर्ती चौक ते अण्णाभाऊ साठे चौक ते पांडे महाल हा रस्ता त्वरित डांबरीकरण करावा, अन्यथा नागरिक, दुकानदार, वाहनधारकांच्या वतीने शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयुर जोशी, प्रशांत देशमुख, शहर समन्वयक ईश्वर टाले, हर्षल टेम्भूरकर,विभाग प्रमुख अनिरुद्ध गाढवे, चित्रागंध सेलोकर, नदीम शेख, सोमेश्वर सेलोकर यांनी दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *