नीट एमडीएस २०२६ परीक्षेत डॉ. नमिराचा देशात प्रथम क्रमांक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत डॉ. नमिरा गालिब सिद्दीकी यांनी नीट एमडीएस २०२६ परीक्षेत देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी परीक्षेत तब्बल ८०२ गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर यशाचे शिखर गाठले असून भंडारा जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात गौरवाने उंचावले आहे. डॉ. नमिरा यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह भंडारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आईवडिलांना, कुटुंबीयांना तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. नमिरा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानातून प्रेरणा मिळाल्याचे नमूद केले. मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून उच्च ध्येय गाठावे आणि समाजात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी, असा संदेश त्यांच्या यशातून मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. नमिरा गालिब सिद्दीकी यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाºया विद्यार्थ्यांसाठी त्या आदर्श ठरल्या आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *