कत्तलीसाठी नेल्या जाणाºया १६ गोवंशीय जनावरांसह दोन वाहने जप्त; पाच आरोपींवर गुन्हा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : मध्य प्रदेशातून गोवंशीय जनावरांची अवैधरित्या व निर्दयतेने वाहतूक करणाºया दोन वाहनांवर तिरोडा पोलिसांनी धडक कारवाई करत १७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक तेजस कोंडे व अंमलदार हर्ष कुर्वे हे खैरलांजी मार्गावर पहाटे सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणारी बोलेरो पिकअप (क्र. एमएच ४० डी ४३२३) आणि आयशर ट्रक (क्र. एमएच ३० बीडी ६५०३) संशयास्पदरीत्या आढळून आली.

पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने बांधून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान बोलेरो पिकअपमध्ये चार तर आयशर वाहनात बारा अशा एकूण १६ गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याचे आढळले. जनावरांची किंमत सुमारे २ लाख ६० हजार रुपये असून दोन्ही वाहनांची किंमत अंदाजे १५ लाख रुपये आहे. अशाप्रकारे एकूण १७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी संबंधित पाच आरोपींविरुद्ध जनावरांना क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरोडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जनावरांची सुटका केली असून पुढील तपास उपपोलीस निरीक्षक तेजस कोंडे करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध पशुवाहतूक करणाºयांमध्ये खळबळ उडाली असून तिरोडा पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *