
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकºयांनी ‘मानस अॅग्रो अँड इन्फ्रा लि. (युनिट-४, देव्हाडा)’ या कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाचे पैसे ५ महिने उलटूनही मिळाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी शासनाकडे केलेल्या आक्रमक पाठपुराव्याची दखल घेत, नागपूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी मानस ?ग्रो कारखान्याला ३ दिवसांच्या आत स्पष्टीकरण आणि कारवाईचा अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकºयांनी जानेवारी २०२६ च्या हंगामात आपला ऊस देव्हाडा येथील मानस अॅग्रो कारखान्याला गाळपासाठी पुरवला होता. नियमानुसार उसाची डिलिव्हरी झाल्यानंतर ठराविक दिवसांत शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे बंधनकारक असते.मात्र, तब्बल ५ महिने उलटून गेले तरीही कारखान्याने शेतकºयांचे हक्काचे पैसे थकवून ठेवले आहेत. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे.
स्वराज्य फाउंडेशनकडून थेट शासनाकडे तक्रार…
शेतकºयांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी ३१ मे २०२६ रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांकडे (साखर) लेखी तक्रार दाखल केली होती. ऊस उत्पादक शेतकºयांचे थकीत पैसे केवळ त्वरित न मिळता, ते कायदेशीर व्याजासह तात्काळमिळवून देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी मेश्राम यांनी आपल्या पत्रात केली होती.
शासकीय यंत्रणा कडक; ३ दिवसांत मागवला अहवाल…
अमित मेश्राम यांच्या तक्रार पत्राची गांभीर्याने दखल घेत प्रादेशिक सहसंचालक (साखर), नागपूर विभाग, नागपूर यांच्या कार्यालयाने २ जून २०२६ रोजी मानस अॅग्रोच्या जनरल मॅनेजरना थेट पत्र जारीकेले आहे. “सदरहू पत्राचे गांभीर्य लक्षात घेवून, पत्राच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा सविस्तर अहवाल ३ दिवसांच्या आत या कार्यालयास सादर करावा,” असे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कारखान्याला दिले आहेत. या पत्राची प्रत माहितीसाठी तक्रारकर्ते अमित मेश्राम यांनाही पाठवण्यात आली आहे.