हरदोली (सि) येथे शेतकºयांचे आंदोलन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. धान उत्पादकांना बोनस व कर्जमाफी देण्यात यावी या मागणीच्या पूर्ततेसाठी आज ७ आॅक्टोंबर रोजी तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील हरदोली (सि.) येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे संचालक अ. कलाम शेख व जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी यांनी केले. आंदोलन स्थळी तुमसरचे नायब तहसिलदार जांभुळकर यांनी भेट देऊन तुमसर व मोहाडी तालुका २९ सप्टेंबर रोजी मंत्रि मंडळात झालेल्या बैठकीत दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले. आंदोलन स्थळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अनेक शेतकºयांनी आप-आपल्या व्यथा मांडल्या. धान उत्पादक शेतकºयांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

धान पिकावर मावा, तुळतुळा, करपा आणी खोडकिडा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले तर हलक्या धान पिकांवरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत तुमसर व मोहाडी तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी उचलून धरण्यात आली होती. धान उत्पादक शेतकºयांना बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कर्जबाजारी शेतकºयांना जाहीर केल्या प्रमाणे २ लाख रुपया पर्यंत सरसकट कर्ज माफी देण्यात यावी व नियमित कर्ज परत फेड करणाºया शेतकºयांना जाहीर करण्यात आलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशि देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.

शेतकºयांचे संकट केवळ पिकांच्या नुकसानी पुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक नियोजनावर, कर्ज परत फेडीवर आणि आगामी हंगामाच्या तयारीवर सुद्धा होत असल्याचे रमेश पारधी यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष मदत, नुकसान भरपाई संदर्भातील निर्णय आणि शेतकºयांच्या मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे अ. कलाम यांनी आपल्या भाषणात सांगितले. शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली तर २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमसर व मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे नायब तहसिलदार जांभुळकर यांनी सांगितले. रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाºया आंदोलन कर्त्यांना लगेच सिहोरा पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात जि. प. सदस्य रमेश पारधी, माजी सभापती तथा संचालक अ. कलाम शेख, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले, माजी जिल्हा परिषद सदस्य, राजेश पटले, माजी सरपंच उमेश कटरे, लखन मोरे, प्रल्हाद आगाशे, बन्सी नागपुरे, गणेश सिंदपुरे, अभय मिश्रा, क्रिष्णा बनकर, कंचन कटरे, प्रवीण मिश्रा, वामन सिंगनजुडे, शैलेश मिश्रा, त्रिनंद कटरे, छगन पारधी, प्रल्हाद आगासे, राजेंद्र बघेले, देवेंद्र मेश्राम, सद्दाम शेख, सुखदेव राऊत व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *