
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : अंधश्रद्धा आणि वाईट व्यसनांच्या आहारी जाणाºया सामान्यांना बाहेर काढून ‘मानव धर्म’ स्थापन करणारे, लाखो लोकांचे श्रद्धास्थान महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची १०५ वी जयंती लाखांदूर येथे अत्यंत उत्साहात आणि सेवाभावी वृत्तीने साजरी करण्यात आली. ‘परमपूज्य परमात्मा एक’ सेवकांनी रुग्णसेवा आणि जनसेवेचा अनोखा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जयंतीनिमित्त लाखांदूर येथील शैलेश बहुद्देशीय सामाजिक संस्था राजनी मुख्य कार्यालय सामोरिल आणि परिसरात येणाºयाजाणाºया नागरिकांसाठी चहा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले. उन्हाचा तडाखा आणि प्रवासाचा थकवा असलेल्या नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.