शेतकरी रोशन कुळे यांनी मागितले इच्छा मरण

भंडारा पत्रिका / नागभीड : तालुक्यातील मिंथूरचे पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारांच्या जाचामुळे कंबोडिया येथे जाऊन आपली किडनी विकल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आणि ते गाजले. त्यानंतर कुळे यांचे पूनर्वसन करण्याचे प्रयत्न शासना कडून झाले. मात्र, आता त्यांनी सरकारकडे चक्क इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. याबाबतचे निवेदन रोशन कुळे यांनी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते, मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, ही बाब गंभीर आहे.

या प्रकरणी विलंब होत असल्यामुळे संबंधित आरोपींना त्यांची संपत्ती लपविणे, विक्री करणे किंवा पुरावे नष्ट करण्याची संधी मिळत आहे. तसेच माझी शेती मला अद्याप परत मिळालेली नाही. मी ‘मायक्रोफायनान्स बँके’ कडून कर्ज उचलून सावकारांना पैसे दिले होते. आता त्यांचा तगादा सुरू झाला आहे. त्यामुळे मला माझी पूर्ण शेती परत करावी. मला व माज्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत व्हावी, सावकरांची संपत्ती लवकरात लवकर गोठवावी, आजपर्यंत माज्या प्रकरणात ठोस कार्यवाही का झाली नाही, याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करावी, अन्यथा मला व माज्या कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे रोशन कुडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *