ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम (रकाना) देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवार, दिनांक ९ जून रोजी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ‘जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम दिला जात नाही, तोपर्यंत जनगणनेवर बहिष्कार राहील’ असा ठाम इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. माजी गृहमंत्री तथा विदर्भ प्रभारी अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार, विदर्भातील ओबीसी सेलच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी हे निवेदन जिल्हाधिकाºयांना सुपूर्द करण्यात आले. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा निषेध नोंदविण्यात आला आहे.

यावेळी माजी आमदार तथा राकॉं. श.प.पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे, विजय नवखरे जिल्हाध्यक्ष ओबीसी भंडारा, शुभदा झंझाड जिल्हाध्यक्ष भंडारा ओबीसी महिला, जिल्हा सचिव अजय मेश्राम, नितेश मारवाडे जिल्हाध्यक्ष युवक, मधुकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे, ज्ञानेश्वर पडोळे, रतन थाटकर,नारायण वैद्य, नितीन तलमले, राकेश श्यामकुवर, जिल्हाध्यक्ष महिला कामगार मीनाताई पौणीकर,शाहिना खान, करुणा राऊत, मलोडे ताई, डोळस ताई, रवींद्र तिडके, बालचंद पाटील, कांतिलाल ढेंगे, माजी नगरसेवक इंद्रजीत येळणे, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार याप्रसंगी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *