तुमसर हादरले! अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून केला व्हायरल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर:- नातेसंबंध आणि माणुसकीला काळिमा फासणारी, तसेच ऐकणाºयाच्या अंगावर काटा आणणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन च्या हद्दीत उघडकीस आली आहे. एका १५ वर्षांच्या निष्पाप अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आला. एवढ्यावरच या विकृतांचे मन भरले नाही, तर त्या व्हिडिओच्या बळावर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. मुलीनेया नराधमांना कडाडून विरोध करताच, त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची समाजात बदनामी केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा सुन्न झाला असून गोबरवाही पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध ‘पोक्सो’ आणि ‘भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसात गुन्हा दाखल!

व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर तिने धैर्याने गोबरवाहीपोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून गोबरवाही चे ठाणेदार शरद शेवाडे यांच्या लेखी आदेशाने पोलिसांनी त्या नराधमांविरुद्ध कायद्याचा कठोर बडगा उगारत भारतीय न्याय संहिता (इठर): कलम ६४ (२)(१) (बलात्कार), ६५(१), ७५ (२) (लैंगिक छळ) पोक्सो कायदा (ा्र’ी): सहकलम ४ आणि ६ (अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार) माहिती तंत्रज्ञान कायदा (कळ अू३): कलम ६७(अ) (अश्लील साहित्य प्रसारित करणे) यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन सज्ञान आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *