
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी : अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आता पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तारीख विधिमंडळ सचिवालयाकडून निश्चित करण्यात आली आहे.पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सोमवार २२ जूनपासून मुंबई येथे सुरू होणार आहे. विधानसभेचे कामकाज सकाळी ११ वाजतापासून सुरू होईल. तर विधान परिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजतापासून सुरू होईल. राज्याचे राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या मान्यतेने विधिमंडळ सचिवांकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. राज्यातील परिस्थिती बघता हे अधिवेशनही वादळी ठरणार असल्याचे संकेत आहे. यात अनेक मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारला घेण्याचा प्रयत्न होईल. यावर मात करण्यासाठी सत्ताधाºयांकडून विरोधकांचे काही मुद्दे उचलून धरण्याची शक्यता आहे.