सात महिन्यांपासून मानधन रखडल्याने पाणी व स्वच्छता कर्मचाºयांचा आक्रोश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील पाणी व स्वच्छतेची कामे करणाºया तालुकास्तरावर कार्यरत गट समन्वयक व समूह समन्वयक यांचे सात महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने कर्मचाºयांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच आरोग्यविषयक बाबी पूर्ण करणे कठीण झाल्याने कर्मचारी वैफल्यग्रस्त जीवन जगत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाºयांनी शुक्रवारी खासदार प्रशांत पडोळे यांची भेट घेऊन तात्काळ मानधन अदा करण्याची मागणी केली. राज्यातील पंचायत समिती अंतर्गत गट संसाधन केंद्रातील (पाणी पुरवठा व स्वच्छता) कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांचे गेल्या सात महिन्यांपासून मानधन थकीत आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असून आर्थिक अडचणींमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन, आरोग्य तसेच इतर आवश्यक खर्च भागविणेही कर्मचाºयांना कठीण होत असल्याने त्यांनी १ जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गट संसाधन कर्मचारी, गट समन्वयक व समूह समन्वयकांनी आज भंडारा येथे शुक्रवारी खासदार प्रशांत पडोळे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली समस्या मांडली. यावेळी कंत्राटी कर्मचाºयांच्या प्रलंबित मानधनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तातडीने अदा करावे तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कर्मचाºयांनी केली.

नियोजित कामबंद आंदोलनाबाबत माहिती घेतल्यानंतर खासदारांनी संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली असून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच केंद्रीय व राज्य मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी करून कर्मचाºयांचे वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय संबंधित मुद्दा योग्य स्तरावर उपस्थित करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भंडारा येथील कर्मचारी संघटनेचे जगदीश तरेकर, शशिकांत घोडीचोर, पल्लवी तिडके, प्रज्ञा देशमुख तसेच गोंदिया येथील गांधी पटले, कैलास कोरे, राज पारधी, अनुप रंगारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *