गणेश मिरवणुकीत ‘डीजे’ चा दणदणाट

● डीजे साउंड सिस्टम जप्त ● संचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई ● तुमसर पोलिसांची कार्रवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधि

तुमसर : गणेश आगमन मिरवणुकी दरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे संचालकाविरुद्ध तुमसर पोलिसांनी कार्रवाई केली. पोलिसांनी साऊंड लेव्हल मीटरच्या सहाय्याने ध्वनीची तीव्रता मोजली असता तब्बल ८९.९ डेसिबल (डे-बी-ओ) ध्वनी पातळीची नोंद झाली. या कार्रवाईत डीजे साऊंड सिस्टम जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी, भंडारा यांनी ४ सप्टेंबर २०२६ रोजी अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार सण-उत्सवांमध्ये कर्णकर्कश साऊंड, डॉल्बी व डीजे सिस्टमच्या वापरापर निबंध घालण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तुमसर पोलिसांच्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकाने ही कार्रवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता हिमेश रामजी राणे (वय २४, रा. मोठेवानी, ता. तुमसर) याच्या मालकीचा डॉल्बी डीजे तुमसर येथे गणेश आगमन मिरवणुकीसाठी वाजविण्यात येत होता. मिरवणूक कोडवानी दवाखान्याजवळ आली असताना डीजेचा आवाज कर्णकर्कश व मोठ्या प्रमाणात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच तुमसर पोलीस ठाण्याचे ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथक कॉसिलो कंपनीच्या साऊंड लेव्हल मीटरसह घटनास्थलळी दाखल झाले. पथकाने डीजेच्या आवाजाची तीव्रता मोजली असता L-Aeq 89.9 db dB इतकी ध्वनी पातळी आढळून आली. त्यामुळे निर्धारित ध्वनी मर्यादांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.

डीजे साउंड सिस्टम जप्त
या प्रकरणी संबंधित डीजे चालक/मालकाविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० तसेच इतर लागू कायदेशीर तरतुदीनुसार कार्रवाई करण्यात आली. पोलिसांनी डीजे साऊंड सिस्टम जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केली असून पुढील कायदेशीर कार्रवाई सुरू आहे.

नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन
ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर व दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सव तसेच इतर धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करावेत. ध्वनी प्रदूषणसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कठोर कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल, असा इशारा तुमसर पोलिसांनी दिला आहे.

ही कार्रवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस ठाणेदार सुबाब बारसे यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

कार्रवाईमध्ये पोलीस निरीक्षक बाळ्ळासाहेब आघाव, ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण स्याम, पोलीस शिपाई नामदेव बळ्ळे, चेतन कुरंजेकर, तिलक चौधरी तसेच महिला पोलीस शिपाई प्रीती कडव यांनी सहभाग घेतला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *