कामगारांच्या आंदोलनाने डोंगरी खाण प्रशासनाची दादागिरी शमली!

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा (बघेडा) : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील व जगप्रसिद्ध डोंगरी मॉयल मॅगनीज खाण परिसरात २० जानेवारी व २१ जानेवारी रोजी सकाळपासून कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने खान प्रशासनात एकच खळबळ उडाली. वेतन कपात व कंत्राटदाराच्या दादागिरी विरोधात आॅपरेटर, चालक व हेल्पर आदी कंत्राटी कर्मचाºयांनी पहिल्या पाळीपासून काम थांबवून तीव्र निषेध नोंदविला. यामुळे खाण उत्पादन ठप्प होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. अखेर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या मध्यस्थीने येथील कंत्राटी कामगारासमोर डोंगरी मॉयल प्रशासनाची दादागिरी शमली. व आगामी सात दिवसांत सदर कामागारच्या मागच्या मंजुर न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशा- रादेखिल सुध्दा देण्यात आला आहे.

मागील महिन्यात खाण प्रशासनाने नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर कामगारांवरील अन्यायाला सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्या कामगारांनी केला होता. यापूर्वी प्रतिमहिना १५ हजार ८०० रुपये वेतन मिळणा?्या कामगारांचे वेतन थेट १२ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप उफाळून आला. एवढेच नव्हे, तर एक दिवस गैरहजर राहिल्यास दीड टक्का दंड लावून कामगारांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वेळोवेळी खाणप्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही वरिष्ठ अधिकाºयांनी कानाडोळा केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *