
भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील संजय दामोधर चोपकर (वय ४०) या तरुणाचे मंगळवारी ११.३० वाजताच्या दरम्यान नागपूरजवळील कढोली येथे अपघाती निधन झाले. संजय हा अल्पभूधारक असून कुटुंबाचे उदर निर्वाह करण्यासाठी रोजंदारीचे काम करायचा, मंगळवारी सकाळी भंडारा येथील कारेमोरेच्या एमएच ३०/ बीडी ०७३६ क्रमांकाच्या आयसर वाहनाने नागपूरला सदर आयसर वाहनावरीलतांदळाची पोती उतरविण्यासाठी गेला असता नागपूर नजीकच्या कढोली येथे उभ्या ट्रेलरला मागेहून जोरदार धडक दिली.
या धडकेत संजय चोपकर हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तर या वाहनाचा चालक किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी पोलीसांनी आयसर वाहनाचा चालकाला ताब्यात घेतले तर मृतक संजय चे मुतदेह शवविच्छेदनानंतर आज बुधवारला कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. आजच दुपारला २ वाजता दरम्यान सिल्ली येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील कमावत्या पुरुषाचे अकाली अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. त्यांचे पश्चात म्हातारे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक ८ वर्षाचा तर दुसरा ४ वर्षाचा अशी दोन मुले असून पित्याच्या निधनाने दोन्ही मुलांच्या वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबियानी एकच टाहो फोडला.