
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिल्ली/आंबाडी:- हिंदू कोड बिल लागू करण्यासाठी कायदामंत्री पदाचा राजीनामा देणारे भारतातील एकमेव नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब! ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनेत आधी ३४० कलम लिहिले, त्यानंतर ३४१ एससी व ३४२ एसटीचा विचार केला.त्यामुळे बाबासाहेब केवळ दलितांचे नेते नसून संपूर्ण भारताचे भाग्यविधाते असून ओबीसी समाजावर बाबासाहेबांचे अधिक उपकार आहेत. त्यामुळे बाबासाहेबांना जाती जातीत वाटून घेणे म्हणजे त्यांचे विचार बंदिस्त करणे होय, असे प्रा. डॉ. नागेश गवळी यांनी प्रतिपादन केले. उदघाटन प्रगती महिला महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. क्रिष्णा पासवान/ मेश्राम यांनी केले.
अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र सोनटक्के, मुख्यवक्ते प्रा़ डॉ़ नागेश गवळी, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी रमाकांत झाल्टे, माजी प्राचार्य अनमोल देशपांडे, विनोद विद्यालयाचे प्राचार्य दादाराव मस्के, प्रा. दिगांबर रामटेके, माजी प्राचार्या रमेश जांगळे प्रा. प्रेमलाल आत्राम, ग्रा. स. कमलाकर अहिर, समीर गभणे, जेष्ठ महिला कांताबाई चव्हाण, जेष्ठ नागरिक प्रकाश हुमणे,बौद्ध विहाराचे अध्यक्ष रंजित हुमणे इत्यादी उपस्थित होते. त्यागमूर्ती माई रमाबाई यांच्या १२८ व्या जन्मोत्सव सोहळानिमित्तमिनी दिक्षाभूमी सिल्ली येथे शनिवारी पुढे बोलतांना ते म्हणाले, रमाईचा त्याग व बाबासाहेब यांच्या कष्टातून दिन दलितांच्या आयुष्याला सोन्याचे दिवस आले. त्यामुळे जगाच्या पाठीवरचा आदर्श जोडपा म्हणजे रमाई व डॉ. बाबासाहेबांचा आहे.
हजारो वर्षापासून जातीवादाच्या रोगाने त्रस्त झालेल्या पिढ्यांना जातीयेतेच्या बांधनातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबानी संविधान नावाची लस आणली.आणि अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेला समाज ज्ञानाच्या प्रवाहात आला. अनिष्ठ रूढी आणि अंधश्रद्धेच्या जाचाविरुद्ध बाबासाहेबांनी शिक्षणाचे चाक फिरवले आणि संपूर्ण समाजाला शिक्षणाची गती मिळाली.म्हणून आमच्या कमरेचे झाडू आणि गळ्यातील मड- के गेले.आम्ही माणसात आलो,असे त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहाराचे सचिव राजेश मेश्राम यांनी केले, संचालन लोकमतचे पत्रकार विलास खोब्रागडे यांनी केले.आभार संदीप गजभिये यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता बुद्ध विहार समितीचे प्रमोद बन्सोड,जागेश्वर बडगे, विवेक गजभिये, लोकेश मेश्राम, सुहास गजभिये, संदिप गजभिये, शैलेश मेश्राम,प्रशील मेश्राम, दिपक मेश्राम, रसूल मेश्राम, चंद्रमनी सरादे, सुमेर मेश्राम, अनुज गजभिये, संजय मेश्राम, अंबादास गजभिये किशोर वासनिक, दिगंबर मेश्राम, उमेश तिरपुडे,सुरेश मेश्राम, प्रदीप मारोती मेश्राम पत्रकार उल्हास तिरपुडे इत्यादींनी सहकार्य केले.