
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा वाढला असून पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसाच्या या शक्यतेमुळे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री वाढलेली थंडी असा दुहेरी परिणाम नागरिकांना जाणवणार आहे. २३ जानेवारीपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून पावसासाठी पोषक स्थिती तयार होत असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.