लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी नाग जवळची घटना
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
लाखांदूर : लाखांदूरला दुपारच्या सुमारास खाजगी कामासाठी गावाहून तालुक्याच्या ठिकाणी गेलेला युवक सायंकाळच्या सुमारास मालकी दुचाकीने स्वगावी परत जात असताना मागेहून समोर जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या अज्ञात ट्रॅक्टरने कट मारल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळचे ६:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी / नाग जवळ घडली. लोमेश मधुकर राऊत (वय २४, रा. कुडेगाव) असे घटेनेतील मृत युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, घटेनेतील मृतक लोमेश दुपारच्या सुमारास काही खाजगी कामकाजासाठी तालुक्याच्या ठिकाणी लाखांदूर येथे आला होता. दिवसभर लाखांदूर येथील कामकाज आटोपून सायंकाळच्या सुमारास तो मालकी दुचाकीने स्वगावी कुडेगाव येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान लाखांदूर वरून पवनी मार्गे जात असताना परसोडी जवळ मागेहून येणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात लोमेश रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडताच अज्ञात ट्रॅक्टर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती गावकऱ्यांसह लाखांदूर पोलिसांना दिली.
माहितीवरून पोलीस अमंलदार संदीप केंद्रे, ओमप्रकाश कापगते, चालक जितू खरकाटे यासह अन्य पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत घटनेचा पंचनामा करीत मृतक लोमेशला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. वृत्त लिहीस्तोवर शवविच्छेदन झाले नसून अज्ञात ट्रॅक्टर चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले