बोदलकसा जलाशय फुटल्या प्रकरणी मुख्यमंत्र्याकडून चौकशी समिती गठित

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे घटना घडल्याचा आ. विजय राहांगडाले यांचा आरोप $\bullet$ धरणातील ४५ टक्के पाणी वाहून गेले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

गोदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात असलेल्या बोदलकसा जलाशयाला गळती लागून तो फुटल्याने जलाशयातील मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. जलाशयात सुमारे ९५ टक्के पाणीसाठा असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पाण्याची गळती सुरू झाल्यानंतर जलाशयाच्या पाळीला भगडा पडल्याने साठविलेल्या पाण्यापैकी जवळपास ४५ टक्के पाणी वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या धटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोदलकसा जलाशयातील पाणी शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाते. सध्या जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळासदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत जलाशयातील मोठ्या प्रमाणातील पाणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान होत असताना सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

धिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आरोप

बोदलकसा जलाशय फुटण्याच्या घटनेवर स्थानीय आमदार विजय राहांगडाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला असून, याप्रकरणी तक्रारही केली आहे. जलाशयाच्या देखभाल-दुरुस्तीबाबत आणि पाणी सोडण्याच्या प्रक्रियेबाबत आवश्यक खबरदारी घेतली होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी या पार्श्वभूमीवर होत आहे.

या गंभीर घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती गठित केली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे आता चौकशी समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले असून, जलाशय फुटण्यामागील नेमकी कारणे आणि संभाव्य जबाबदारी निश्चित होण्याच्या अपेक्षे व्यक्त केली जात आहे.

दुष्काळाच्या संकटात सिंचनाच्या पाण्याची चिंता

एका बाजूला दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना दुसऱ्या बाजूला जलाशयातील मोठ्या प्रमाणातील पाणी वाहून गेल्याने सिंचनाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्यास रब्बी हंगामासह आगामी सिंचनासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जलाशयाच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे, उर्वरित पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आणि घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *