भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मच्छिमारांना दुष्काळाचे आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मत्स्यपालन मंत्री नितेश राणे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भंडारा जिल्ह्यात अनेक मच्छिमार सहकारी संस्था असून मामा तलाव, पाझर तलाव व खाजगी तलाव १५०० पेक्षा जास्त आहेत. सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत पाटबंधारे विभागाच्या तलावांना प्राधान्य दिले जात असून खाजगी तलावांना वगळले जात आहे.
वास्तविक जिल्ह्यातील बहुतांश मच्छिमार हे खाजगी तलावांवर अवलंबून आहेत. जर खाजगी तलावांना दुष्काळाच्या शासन धोरणात समाविष्ट केले नाही तर मच्छिमारांवर उपासमारीची व आत्महत्येसारखी वेळ येऊ शकते, असे निवेदन भंडारा जिल्हा मच्छिमार संघाच्या वतीने प्राप्त झाल्याचे आमदार भोंडेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाºयांना सूचना देऊन खाजगी तलाव धारक मच्छिमारांना देखील दुष्काळ परिस्थितीचा लाभ द्यावा व शासनाच्या धोरणात समाविष्ट करावे, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.