भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील खरीप हंगामात प्रतिकूल हवामान व पावसाच्या अनियमिततेमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी उन्हाळी धान पिकाची लागवड करणे आवश्यक झाले आहे. यासाठी करचखेडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत येणाºया आठ गावांना तातडीने सिंचनाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उसरागोंदी, माटोरा, सितेपार, खमारी, मांडवी, बेलगाव, मंडनगाव आणि किटाळी या गावांचा समावेश आहे.
सर्व गावांना उन्हाळी धान लागवडीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, पाणीपुरवठ्यात समानता व नियमितता ठेवावी तसेच संबंधित सिंचन विभागाच्या अधिकाºयांना आवश्यक आदेश द्यावेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. उन्हाळी धान लागवडीचा हंगाम लक्षात घेता प्रशासनाने विलंब न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती ग्रामस्थ व शेतकºयांनी केली आहे. निवेदन देतांना प्रभाकर सार्वे, राजु लुटे,शेखर बुजाडे,हरिदास पडोळे, मनोज लुटे,बंडु लांबट, विजय रोडगे,प्रवीण उदापुरे तसेच शेतकरी उपस्थित होते.
