चिमूर : तीन जणांचा बळी घेऊन दहशत निर्माण करणाºया त्रिशुल वाघाला अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले आहे. ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून या वाघाचा माग काढला जात होता. अत्यंत सावधपणे वावरणाºया या वाघाला अखेर ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईमुळे जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
