तलाठ्यांच्या दारात शेतकºयांची फरफट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शेतकºयांच्या हक्काच्या कागदपत्रांसाठी त्यांनाच तलाठी कार्यालयाच्या उंबरठ्यावर ताटकळत बसावे लागत असेल, तर महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सातबारा, फेरफार, वारस नोंदी आणि पीक पाहणीसारख्या अत्यावश्यक कामांसाठी शेतकºयांना वारंवार चकरा माराव्या लागत असून, तलाठ्यांच्या अनियमित उपस्थितीमुळे शेतकºयांची मोठी गैरसोय होत आहे. या गंभीर प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, प्रलंबित कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर प्रशासकीय स्तरावर कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

सविस्तर वृत्त असे की,कन्हाळगाव साज्याचे तलाठी हिमांशु साखरे हे निर्धारित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप या भागातील शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, पीक पाहणी आणि विविध शासकीय दाखल्यांसाठी वारंवार तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. शेतीची महत्त्वाची कामे बाजूला ठेवून कार्यालयात ताटकळत बसण्याची वेळ शेतकºयांवर येत असून, दिवसभर प्रतीक्षा करूनही काम न झाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची परिस्थिती आहे. शेतकºयांसाठी सातबारा आणि इतर महसुली नोंदी या केवळ कागदपत्रे नसून, त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा आणि शासकीय योजनांच्या लाभाचा महत्त्वाचा आधार आहेत. बँकेचे कर्ज, पीक विमा, विविध शासकीय योजना तसेच शेतीविषयक व्यवहारांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्यास शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

एका कागदपत्रासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने शेतकºयांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. शेतीच्या हंगामात अशा दिरंगाईमुळे शेतीच्या कामांवरही परिणाम होत असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान, तलाठी कार्यालयातील अनियमित उपस्थिती आणि प्रलंबित कामांमुळे सर्वसामान्य शेतकºयांची होणारी गैरसोय प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी. तलाठ्यांनी आठवड्यातील निर्धारित कार्यालयीन दिवशी वेळेत उपस्थित राहून शेतकºयांची कामे करावीत. गावातील सर्व प्रलंबित कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण करावीत. तसेच, तलाठी हिमांशु साखरे यांची तात्काळ बदली करून पयार्यी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके यांनी केली आहे. एकंदरीत, शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या कागदपत्रांसाठी वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणे, ही महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटी आहे. प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावावीत. निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित जबाबदार अधिकाºयांवर प्रशासकीय स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उईके यांनी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *