निमगाव लघु प्रकल्पासह डोंगरगाव येथील राखीव क्षेत्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात सविस्तर चर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई / तिरोडा : आज मंत्रालय, मुंबई येथे निमगाव लघु प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासंदर्भात तसेच गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगाव येथील एकूण ९८ सर्व्हे क्रमांकांमधील ३९.४७ हेक्टर राखीव क्षेत्र रद्द करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक व सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. इंद्रनील नाईक, महसूल विभागाचे मुख्य सचिव विकास खारगे तसेच वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी संबंधित दोन्ही विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.

निमगाव लघु प्रकल्पाला गती देण्याबाबत चर्चा

निमगाव लघु प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लागून प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर व्हाव्यात आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हाव्यात, यासाठी चर्चा करण्यात आली. या प्रकल्पामुळे परिसरातील सिंचनाच्या प्रश्नाला दिलासा मिळण्याच्या दृष्टीने प्रकल्पाची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

डोंगरगाव येथील ३९.४७ हेक्टर राखीव क्षेत्र रद्द करण्याबाबत पाठपुरावा

गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगाव येथील एकूण ९८ सर्व्हे क्रमांकांमध्ये समाविष्ट असलेले ३९.४७ हेक्टर राखीव क्षेत्र रद्द करण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर क्षेत्रासंदर्भातील प्रशासकीय व महसूल विभागाच्या स्तरावरील बाबींचा आढावा घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दोन्ही विषय हे गोंदिया जिल्ह्याच्या विकासाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून प्रलंबित प्रश्नांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या बैठकीत संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून, पुढील प्रशासकीय कार्यवाहीच्या माध्यमातून दोन्ही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *