भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा येथील ट्युशन गल्ली, राजीव गांधी चौक परिसरातील कॅट लायझर ट्युशन क्लासेशची बातमी प्रकाशित केल्यामुळे पत्रकाराला धमकी देऊन दबाव आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बी.एस. क्राईम न्यूजचे मुख्य संपादक शमशेर खान यांनी पोलीस अधीक्षक, भंडारा जिल्हा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, दि. २६ आॅक्टोबर २०२६ रोजी कॅट लयझर ट्युशन क्लासेसमध्ये एका विद्यार्थिनीची अचानक प्रकृती बिघडली होती. तिला चक्कर आल्याने ती क्लासच्या बाहेर रडत बसली होती. त्यावेळी तेथून जाणाºया एका पोलीस कर्मचाºयाने तिला सामान्य रुग्णालय, भंडारा येथे उपचारासाठी दाखल केले. पत्रकार शमशेर खान हे काही कामानिमित्त रुग्णालयात गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना माहिती देऊन विद्यार्थिनीवर उपचार करण्याची विनंती केली व जनहिताच्या दृष्टीने या घटनेची बातमी आपल्या न्यूज चॅनलवर प्रकाशित केली.
ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर पत्रकार काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. दि. ३० आॅक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता भंडाºयात परत आल्यानंतर त्यांना बातमी का प्रकाशित केली, ती डिलीट करा, असे म्हणत काही फोन आले व दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दि. ३१ आॅक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकाराने कॅटलायझर ट्युशन क्लासेस चे संचालक रमेश सर यांना फोन करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, रमेश सर यांनी अपमानास्पद भाषेचा वापर करून पोलिसात तक्रार करण्याची आणि न्यायालयात खेचण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनहिताच्या बातम्या प्रकाशित केल्यामुळे धमकावणे गंभीर असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
क्लासेसची भौतिक तपासणी करण्याची मागणीया घटनेच्या अनुषंगाने पत्रकाराने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, भंडारा पोलीस स्टेशन व न. प. मुख्याधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे. क्लासेसच्या इमारतीची भौतिक स्थिती, विद्यार्थी संख्येनुसार जागा, प्रवेश नोंदणी, हजेरी रजिस्टर, बॅचमधील विद्यार्थी संख्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रथमोपचार, अग्निसुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, आवश्यक शासकीय परवानग्या, अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आदींची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भंडारा नगरपरिषदेने पार्किंगच्या मुद्यावरून या ठिकाणी कारवाई केल्याची माहिती असल्याने नगरपरिषद व वाहतूक विभागाने पुन्हा पाहणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. फोन कॉलचे तपशील, ध्वनिमुद्रिका यांची तपासणी करून धमकी देणाºयांवर कारवाई करावी, क्लासेसची संबंधित विभागामार्फत तपासणी करून अहवाल तयार करावा आणि पत्रकाराच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, अशी मागणी तक्रारदार शमशेर वाहाब खान यांनी केली आहे.
