बस-दुचाकीच्या भीषण धडकेत २४ वर्षीय युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुमसर-नागपूर मार्गावरील सिरसी गाव फाट्याजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेली आई गंभीर जखमी झाली. ही घटना १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. दिपांशु मनोहर डोंगरे (वय २४, रा. नेहरू वार्ड, वरठी) असे मृत युवकाचे नाव असून, माधुरी मनोहर डोंगरे (वय ५३) असे गंभीर जखमी आईचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष शिवशंकर तांडेकर (वय ३६, रा. इंदिरानगर, सावरी, ता. जि. भंडारा) हे बस क्रमांक एमएच ४०/वाय/५८१८ चे चालक असून, घटनेच्या वेळी ते तुमसर येथून प्रवासी घेऊन भंडारा मार्गे नागपूरकडे जात होते.

दरम्यान, सिरसी गाव फाट्याजवळसमोरून येणाºया दुचाकी क्रमांक एमएच ३६/एटी/०८६७ वरील चालक दिपांशु डोंगरे याने वाहन रस्त्याच्या विरुद्ध बाजूने हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने समोरून येणाºया बसला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दिपांशु याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या त्याच्या आई माधुरी डोंगरे या जखमी झाल्या. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेप्रकरणी बसचालक मनीष तांडेकर यांच्या तोंडी तक्रारीवरून वरठी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अप.क्र. ५०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१), १२५(अ)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय मडावी करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *